• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • महाराष्ट्राचा 'दस का दम', राज्यात 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

महाराष्ट्राचा 'दस का दम', राज्यात 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने...

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने...

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने...

 • Share this:
  मुंबई, 09 नोव्हेंबर : देशभरात 100 कोटी लसीकरणाचा (corona vaccination) टप्पा पार झाल्यामुळे केंद्र सरकार जल्लोष साजरा करत आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात सुद्धा आता  कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने (maharashtra corona vaccination) दहा कोटींचा टप्पा पार केला आहे. आज दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती  रोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली. राज्यात लशीची पहिले डोस ६,८०,५३,०७७ तर दुसरे डोस ३,२०,७४,५०४ देण्यात आले आहेत. एकूण १०,०१,२७,५८१ लशीचे डोस देण्यात आल्या आहेत. या यशात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या बरोबरच लसीकरण मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. Share Market : शेअर बाजारात आज घसरण; उद्या कशी असेल बाजाराची दिशा? लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. लवकरच राज्यातील प्रत्येक नागरिकाला लशीच्या दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट आहे, असंही टोपे म्हणाले. Ola E-Scooter: फॅक्ट्रीमध्ये कशी बनते ओला ई-स्कूटर, पाहा VIDEO राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाच्या वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले, असंही टोपे यांनी सांगितलं.
  Published by:sachin Salve
  First published: