Home /News /mumbai /

महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर: चैत्यभूमीच्या दर्शनाची पालिका करणार Online सोय

महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर: चैत्यभूमीच्या दर्शनाची पालिका करणार Online सोय

दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत असतात. कोविडची संभाव्य दुसरी लाट पाहता आंबेडकरी अनुयायांना घरूनच चैत्यभूमीच दर्शन घेण्यासाठी सोय करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई 20 नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला (Mahaparinirvana Day 6th December) दादरच्या चैत्यभूमीवर (Dadar chaityabhoomi) देशभरातून लाखो लोक येत असतात. गेली अनेक वर्ष ही गर्दी वाढतच आहे. इथे नुसती गर्दी होत नाही तर पुस्तक, वैचारिक साहित्य, चळवळ, संस्कृती अशा सगळ्याच गोष्टींचं प्रचंड मोठं मंथन घडत असतं. त्यामुळे या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. मात्र कोरोनामुळे यावेळी चैत्यभूमीवर लोकांना न येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका (BMC) दिवसभर चैत्यभूमीच्या दर्शनाची Online सुविधा करणार असून थेट घरबसल्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत असतात. कोविडची संभाव्य दुसरी लाट पाहता आंबेडकरी अनुयायांना घरूनच चैत्यभूमीच दर्शन घेण्यासाठी सोय करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याबाबतच्या कामकाजाचा आढावाही जयस्वाल यांनी यावेळी घेतला. 'कार्तिकी'साठी वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये बंदी, 11 गावांमध्ये रात्रीचा कर्फ्यू दरवर्षी चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. ही सर्व नियमित कामे सध्या सुरु आहेत. जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करुन हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करुन देण्यात येणार नाहीत. ऊसाच्या शोधात हत्ती पोहोचला गावात; रागाच्या भरात घातला गोंधळ, पाहा Viral Video मात्र शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: BMC

पुढील बातम्या