मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mahaparinirvan Diwas 2021: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

Mahaparinirvan Diwas 2021: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

Mahaparinirvan Diwas 2021 guidelines: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Mahaparinirvan Diwas 2021 guidelines: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Mahaparinirvan Diwas 2021 guidelines: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 30 नोव्हेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर कऱण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये 'ओमायक्रॉन' या नव्या विषाणूचा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. हा विषाणू नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. असे आवाहनही करण्यात आले आहे. (Maharashtra Government guidelines for Mahaparinirvan Diwas 2021)

वाचा : मुंबईत उद्यापासून सुरु होणार नाहीत शाळा, आयुक्तांनी दिली नवी तारीख

राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.

2) कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गद दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

3) महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.

यासोबतच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

वाचा : पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, पुणे मनपाचा मोठा निर्णय

4) चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच थर्मल स्क्रिनिंगच्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसादारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येईल.

कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाता संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

5) महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने आणि मोर्चे काढू नयेत.

First published:

Tags: Mumbai