मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

यंदाही आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास मनाई? कोरोनाच्या नव्या संकटाचा फटका

यंदाही आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्यास मनाई? कोरोनाच्या नव्या संकटाचा फटका

गेली 2 वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर येत आलं नाही. मंदिर खुली करण्यात आली, विविध कार्यक्रम, जत्रा यांना परवानगी दिलयांनातर चैत्यभूमीवर यावर्षी येता येईल अशी अनुयायांना अपेक्षा होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारापेठा, मॉल, सिनेमागृह, मंदिरं उघडण्यात आली आहे. पण दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट (Omicron Variant)  आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने कोरोनाची नवी नियमावली corona rules) जाहीर केले आहे. अशातच 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने (Mahaparinirvan day 2021 ) लाखो अनुयायी मुंबईत येत असता पण यंदाही चैत्यभूमीवर येण्यास मनाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

गेली 2 वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना चैत्यभूमीवर येत आलं नाही. मंदिर खुली करण्यात आली, विविध कार्यक्रम, जत्रा यांना परवानगी दिलयांनातर चैत्यभूमीवर यावर्षी येता येईल अशी अनुयायांना अपेक्षा होती. पण कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचे थैमान पाहता यावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांवर ही कंपनी झाली उदार! विमानाच्या तिकिटापासून सर्व खर्च उचलणार कंपनी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई मनपा आयुक्त इकबाल चहल आणि विविध संघटनेचे नेते उपस्थितीत होते. ६ डिसेंबरला अनुयायांना घरूनच श्रद्धांजली देण्याची विनंती करण्यात आली आहे.

या बैठकीनंतर या दिवसाच्या आयोजनाच प्रारूप ठरवलं जाणार आहे. चैत्यभूमीवर गर्दी करू दिली जाणार नाही याचीच शक्यता अधिक वाटतेय, अशी माहिती विश्वशांती सामाजिक संघटनेचे प्रतीक कांबळे यांनी दिली.

विमान प्रवाशांची माहिती मिळाल्यास  संसर्गाला रोखणे सोपे जाईल – मुख्यमंत्री  

दरम्यान, कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली.  यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले.

Aadhaar Card हरवलंय? Online असा शोधा आधार नंबर

ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट सर्वात मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रीया या देशांमध्ये दर दिवशी 30 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त झालेले आढळत आहेत. ओमायक्रॉन विषाणुचे 50 पेक्षा जास्त म्युटेशन आहेत.  सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या व्हेरियंटची लागण असल्यास एस जिन आढणार नाही.  सध्या तरी प्रतिबंधासाठी मास्क सर्वात जास्त आवश्यक आहे.  केंद्र सरकारने 12 देशातल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून इथे उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच 7 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

First published: