'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर

'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करावा. त्यांना लोकसभा तिकीट देऊ अशी ऑफर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी उदयनराजे भोसले यांना दिली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 10 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करावा. त्यांना लोकसभा तिकीट देऊ अशी ऑफर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी उदयनराजे भोसले यांना दिली आहे.

काल जानकरांची उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. त्यावेळेस ऑफर दिल्याचं जानकर यांनी सांगितलं आहे.

येत्या काळात धनगर समाज आरक्षणाबाबत लवकरच गुड न्यूज मिळेल असे सूचक संकेतही जानकर यांनी दिले. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम यांच्या पाठीमागे सर्व धनगर समाज जाणार नाही. त्यांच्या इथे घोंगड्या दिसल्या पण स्टेजवर आंबेडकर आणि ओवेसीच होते अशी टीकाही जानकर यांनी केली.

लोकसभांच्या पाच जागांसाठी रासपने तयारी केली आहे. भाजप जिथं सांगेल तिथं निवडणूक लढवू असं सांगत बारामतीत निवडणूक लढवणार की नाही हे मात्र जानकर यांनी स्पष्ट केलं नाही. उदयनराजे भोसले यांनी काल भेट घेतली.

'राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत.राजे रासपचाही विचार करावा. ते आले तर त्यांना लोकसभा तिकीट देऊ, भाजपला आम्ही विनंती करू सातारा जागा रासपला द्यावी,' अशी ऑफर जानकरांकडून देण्यात आली आहे.

तर यावेळेस रासपनं लोकसभा तयारी सुरू केली आहे. सातारा, माढा, परभणी, ईशान्य मुंबई, बारामती जागेची रासप तयारी करतोय. भाजप यापैकी जिथे जागा देईल त्या जागा ते लढवणार. स्वत: निवडणूक लढवू पण भाजप ज्या जागा देईल तिथं निवडणूक लढवणार असल्याचं जानकर म्हणाले आहेत.

VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 02:00 PM IST

ताज्या बातम्या