'रेरा'चा फटका, म्हाडाची लाॅटरी लांबणीवर

'रेरा'चा फटका, म्हाडाची लाॅटरी लांबणीवर

म्हाडा लॉटरी नेहमीप्रमाणे ३१ मे ला होणार नाही. राज्यात लागू झालेल्या 'रेरा' कायद्यामुळे म्हाडाची सोडत लांबणार आहे.

  • Share this:

09 मे : मुंबईत घर घेऊ पाहणारे म्हाडाच्या लॉटरीची चातकासारखी वाट पाहत असतात. पण हीच लॉटरी नेहमीप्रमाणे ३१ मे ला होणार नाही. राज्यात लागू झालेल्या 'रेरा' कायद्यामुळे म्हाडाची सोडत लांबणार आहे.

नवीन कायद्यानुसार प्रकल्पांची नोंदणी महा रेराच्या प्राधिकरणाकडे करणं बंधनकारक आहे. रेरा लागू झाल्यामुळे म्हाडाला महा रेरा प्राधिकरणाकडे विकासक म्हणून नोंद करावी लागणार आहे.

सध्या म्हाडानं ही सर्व प्रक्रिया सुरू केली आहे आणि म्हणूनच पुढच्या प्रक्रियेला विलंब होणार आहे. या प्रक्रियेला एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या सोडतीला फटका बसणार आहे. यावर्षी मुंबईच्या सोडतीत 750 घरं असतील.

First published: May 9, 2017, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading