मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी : तळीये गावात 32 घरांवर दरड कोसळली; तब्बल 75 नागरिक बेपत्ता

मोठी बातमी : तळीये गावात 32 घरांवर दरड कोसळली; तब्बल 75 नागरिक बेपत्ता

पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 22 जुलै : मुसळधार पावसामुळे कोकणात (Heavy rain in Konkan) हाहाकार माजला आहे. दरम्यान येथील अनेक गावांसोबतचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान महाड येथून दरड कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये तब्बल 32 घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये तब्बल 75 जणं बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. महाड तालुका बिरवाडी पासून 14 किलोमीटरवर तळीये या गावी गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सुमारे 32 घरे गाडली गेली असून 72 लोक बेपत्ता आहेत. तळीयेच्या सरपंचांनी याबाबत माहिती दिली. या ठिकाणी NDRF ची मदत पाठविण्यात आली आहे. मात्र पावसाचा वेग कायम असल्याने मदतकार्य धीम्या गतीने सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

सायंकाळच्या वेळेत सर्वजण घरी असल्यामुळे जीवितहानी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे.

महाड येथील तळये गावात दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नेमके किती जणं अडकले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

बातमी अपडेट होत आहे...

हे ही वाचा-खडवली नदीतून मृतदेह वाहून जात असतानाचा धक्कादायक VIDEO आला समोर

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला (Vashisht River) पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.

First published:

Tags: Rain, Village