Home /News /mumbai /

अडीच वर्षांच्या संसारानंतर ठाकरे सरकारचा अखेर अस्त? खुद्ध संजय राऊतांनी दिले संकेत

अडीच वर्षांच्या संसारानंतर ठाकरे सरकारचा अखेर अस्त? खुद्ध संजय राऊतांनी दिले संकेत

एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde)  यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे.

एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे.

एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे.

    मुंबई, 22 जून :  शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde)  यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा आता बरखास्तीकडे चालली आहे, असं सूचक ट्वीट केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकाराचा संसार अखेरीस अडीच वर्षात आटोपला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच मोठे बंड पुकारले आहे. सर्व आमदारांना घेऊन शिंदे हे आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३३ आमदारांची फौज आहे. एकनाथ शिंदे हे आज राज्यपालांना भेटून प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हात आता खाली टेकले आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं म्हणत संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या अस्ताचे संकेत दिले आहे. दरम्यान ,hackery) यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विधानसभा बरखास्त करण्याची चर्चा केली जाणार आहे. सरकारने जर बरखास्तीचा प्रस्ताव ठेवला तर निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पण विधानसभा बरखास्त करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार हा राज्यपालांना असणार आहे. सरकार जर अल्पमतात आलं तर राज्यपाल हे विरोधी पक्षाला संख्याबळ सिद्ध करण्यासाठी निमंत्रण देेऊ शकते. जर निवडणूक लागली तर सेनेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. हीच बैठक आज अखेरची बैठक असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार अशी माहिती देणार आहे. त्यानंतर ते आपला राजीनामा देणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या