खोकला आणि नंतर ताप आल्याने अमित देशमुखांनी केली कोविड -19 चाचणी, असा आहे रिपोर्ट

खोकला आणि नंतर ताप आल्याने अमित देशमुखांनी केली कोविड -19 चाचणी, असा आहे रिपोर्ट

'खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोन टेस्ट झाली. कुणीही लक्षणे लपवू नयेत.'

  • Share this:

मुंबई 08 एप्रिल : खोकला आणि ताप आल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली. डॉक्टरांनी सल्ला दिल्याने आपण ही टेस्ट केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. या टेस्टचा रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याचंही त्यांनी सांगितलं. अजुन काही दिवस घरूनच काम करणार असून नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचा निर्णय घेऊन असंही ते म्हणाले.

अमित देशमुख पुढे म्हणाले, मला खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  मंगळवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कोरोना टेस्ट करून घेतली. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला आणि ताप आल्याने कोविड-19 चाचणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितल्याने ही चाचणी जे.जे. रुग्णालयातल्या फिवर क्लिनिक येथे करून घेतली होती. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने  यांच्या सल्ल्याने ही टेस्ट झाली होती.

आज रिपोर्ट  नेगेटिव्ह आला आहे. काळजीचे कारण नाही. आणखी चार दिवस घरून काम पाहणार आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - मुंबईत कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सापडले 106 नवे रुग्ण

वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण  झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये, त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आपण ही चाचणी करून घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्य शासनाने ठिकठिकाणी फिवर ओपीडी सुरू केली आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून कोरोना तपासणीची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन करोना तपासणी करून  घ्यावी. आजार लवकर लक्षात आल्यास तातडीने उपचार करणे आणि लवकर बरे होणे शक्य असल्याने अधिकाधिक लोकांनी पुढे यावे असं आवाहनही त्यांनी केलं.

हे वाचा -  शेवटचं बोलून घ्या! मृत्यूच्या दारात कोरोनाग्रस्तांना मेडिकल स्टाफ देतोय मोबाईल

ते पुढे म्हणाले, शासनाकडून कोविड -19  संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन सगळ्यांनी करावे. कोविड -19  तपासणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. याचा विस्तार आणि व्याप्ती वाढविण्याचे काम सुरू आहे. आपल्यात लक्षणे दिसत असतील, तर कोविड-19 संदर्भातील हेल्पलाईनला संपर्क करा, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि चाचणी  करून घ्या  असे आवाहन सगळ्यांनीच केलं आहे.

आपले आई-वडील,  कुटुंब  आणि शेजारी  यांना करोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी आपणाला घ्यावयाची आहे असंही त्यांनी सांगितलं.

First published: April 8, 2020, 8:21 PM IST

ताज्या बातम्या