चीनसारखचं मुंबईत 15 दिवसांमध्ये उभं राहणार 1,000 खाटांचं COVID-19 हॉस्पिटल!

चीनसारखचं मुंबईत 15 दिवसांमध्ये उभं राहणार 1,000 खाटांचं COVID-19 हॉस्पिटल!

MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली हे 1000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करीत आहे.

  • Share this:

मुंबई 02 मे: कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनने ज्या प्रकारे वुहान शहारात 1,000 खाटांचे कोविड19 हाँस्पिटल युद्धपातळीवर उभारले तसेच महाराष्ट्र सरकार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1,000 खाटांचे कोविड19 हाँस्पिटल उभारत आहे. हे हाँस्पिटल आँक्सिजन आणि माँनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील 15 दिवसांत हे हाँस्पिटल युद्धपातळीवर उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नगरविकस मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष टिम तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरवातही केली आहे. हे हॉस्पिटल हे तात्पुरतं असणार आहे.

याच युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामाची पहाणी करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. ठाणे येथील ज्युपीटर हाँस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली आणि एमएमआरडीए संयुक्तपणे या 1,000 खाटांच्या हाँस्पिटलची निर्मिती करत आहे.

MMRDA ज्युपिटर हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली हे 1000 खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे करीत आहे. अंदाजे 15 दिवसांत हे रुग्णालय उभे राहणार आहे, त्यापैकी काही भाग हा येत्या 8 दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

VIDEO अडकलेल्या परप्रांतिय मजुरांचा उद्रेक, पोलिसांवर केली तुफान दगडफेक

देशात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 11.5 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील वेगानं वाढणार्‍या कोरोना (Corona) रुग्णांना पाहता आता मुंबईला पहिली मोबाईल कोव्हिड-19 टेस्टिंग बस मिळाली आहे.

या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार आहे. वरळी इथल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बृहमुंबई नगरपालिका (बीएमसी) चे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बसचं उद्घाटन केलं.

बापरे! सिमेंट मिक्स करणाऱ्या अजस्त्र टाकीत बसले 18 मजूर, VIDEO पाहून बसेल धक्का

कोव्हिड-19 टेस्टिंग बसमध्ये कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. यासह या बसमध्ये एक्स-रे परीक्षेची सुविधादेखील उपलब्ध आहे. ज्या बसमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे एक लहान चेंबर बनविला गेला आहे.

First published: May 2, 2020, 7:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या