News18 Lokmat

मॅग्नेटिक महाराष्ट्रात आश्वासनांचा पाऊस !

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 ची आज सांगता झाली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 10:33 PM IST

मॅग्नेटिक महाराष्ट्रात आश्वासनांचा पाऊस !

मुंबई 20 फेब्रुवारी - मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 ची आज सांगता झाली. समिटच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 4106 सामंज्यस्य करार करण्यात आले तर 12 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे फक्त आश्वासनांचा पाऊस असल्याची टीका विरोधकांनी केलीय.

मराठवाड्याला गिफ्ट

लातूरमध्ये रेल्वेच्या डब्यांचा कारखाना उभारण्यात येणार असल्याची घोषणा सरकारनं केली होती. या समिटमध्ये त्यावरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दुष्काळात लातूरला रेल्वेतून पाणी आणावं लागल्यानं लातूरच्या औद्योगिकरणाला मोठा धक्का बसला. आधी रेल्वे पाणी घेवून धावून आली आणि आता कोच फॅक्ट्रीच्या रूपानं विकासाची गंगाच येणार आहे. उपनगरीय लोकल रेल्वेचे डबे आणि मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱया डब्यांची निर्मिती करणारा कारखाना लातूरात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे लातुरच्या विकासपर्वाचं एक सोनेरी पान ठरणार आहे. अंदाजे 1.5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मराठवाड्यात होणार असून लाखो लोकांना त्यापासून फायदा होणार आहे.

काय झालं 'मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018' मध्ये

 सामज्यंस्य करार - 4106

Loading...

अपेक्षित गुंतवणूक - 12 लाख 10 हजार कोटी

अपेक्षित रोजगार निर्मिती - 36 लाख

उद्योग क्षेत्रातली अपेक्षित गुंतवणूक - 5 लाख कोटी

बांधकाम क्षेत्रातली अपेक्षित गुंतवणूक - 3 लाख कोटी

सरकारच्या इतर प्रकल्पांमध्ये -  3 लाख कोटी

अपेक्षित रोजगार - 1 लाख लोकांना

रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये 16 हजार कोटींचा सामंज्यस्य करार

रेल्वे आणि राज्य सरकार 600 कोटींचा करार

2016 मध्ये झालेल्या मेक इन इंडियात काय झालं होतं?

-  2984 सामंजस्य करार झाले.

- 8 लाख कोटी ची गुंतवणूक अपेक्षित  होती.

- पूर्ण झालेले प्रकल्प 896 , गुंतवणूक 72 हजार 130 कोटी

- 2 लाख 93 हजार 260 कोटींची 597 प्रकल्प काम सुरू आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 10:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...