राज्यात 1 लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गर्जना

राज्यात 1 लाख कोटी गुंतवणुकीचे लक्ष्य पूर्ण करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गर्जना

'महाराष्ट्र या कोरोना (Corona) परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल'

  • Share this:

मुंबई, 3 नोव्हेंबर : 'राज्यात (Maharashtra) एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष पूर्ण करणार, महाराष्ट्र या कोरोना (Corona) परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल', असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34,850 कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा दावा

'गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. सुमारे 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

'सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक होते आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल. कोरोनासारख्या संकट काळातही उद्योग विभागाने उद्योजकांचा विश्वास कायम ठेवला आहे', असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शुक्रवारपासून 'या' जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती, नियम तोडल्यास होणार कडक कारवाई

'युनिटी इन डायव्हर्सिटी असे हे करार आहेत. केमिकल, डेटा यासह लॉजिस्टिक, मॅनुफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील उद्योग राज्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र हा डेटा सेंटरच्या बाबतीतही देशाचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री  आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: November 3, 2020, 8:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या