माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर, सूत्रांची माहिती

माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर, सूत्रांची माहिती

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. माधुरी दीक्षितला भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 06 जून : अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. माधुरी दीक्षितला भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माधुरी दीक्षितचं राजकीय वजन वाढतंय असं दिसतंय.

माधुरी दीक्षित यांच्या भेटीनंतर ते गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांची भेट घेणार आहेत.राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्यात. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या जागा आता रिकाम्या आहेत. कदाचित माधुरीला राज्यसभेचं तिकीट मिळेल, अशीही चर्चा आहे.

माधुरीची 'बकेट लिस्ट ?'

- माधुरी दीक्षितचं राजकीय वजन वाढतंय का ?

- मध्यमवर्गीयांना आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न

- उत्तर भारतीयांची मतं आकर्षित करण्यासाठी माधुरी अस्त्र ?

- मध्यमवर्गीयांमधली नाराजी कमी करण्यासाठी रणनीती ?

- लोकप्रियता, स्वच्छ प्रतिमा जमेची बाजू

- महिलांमध्ये माधुरी अधिक लोकप्रिय

- महिलांची मतं आकर्षित करण्यासाठी भाजपची खेळी ?

- 2019मध्ये स्टार पॉवरचा वापरण्याचा भाजपचा प्लॅन

First published: June 6, 2018, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading