अखेर माधव भांडारींना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

अखेर माधव भांडारींना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

माधव भांडारी यांच्यावर नाणार प्रकल्प भूसंपादनाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

  • Share this:

मुंबई, 27 एप्रिल : भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांचं अखेर पुनर्वसन करण्यात आलंय. माधव भांडारी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. त्यांच्यावर नाणार प्रकल्प भूसंपादनाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.

विधान परिषद निवडणुकीत माधव भांडारी यांना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर माधव भांडारी नाराज असल्याची चर्चा होती. अखेर भाजपने माधव भांडारी यांचा मान राखत राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल केलाय. वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची जबाबदारी सोपवण्यात आलीये.   भुसंपादन प्राधिकरणाचे पुनर्गठन करून माधव भांडारी यांची राज्यमंत्री दर्जा देवून नियुक्ती करण्यात आलीये.

महसूल आणि वन विभागाअंतर्गत येणाऱ्या राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समिती यांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे.

माधव भांडारी हे समितीचे अध्यक्ष मदत आणि पुनर्वसन मंत्री असतील तर त्यात सदस्य म्हणून महसूल, वने, ऊर्जा, उद्योग आणि वित्त मंत्री तसंच या विभागाचे सचिव असतील.

First published: April 27, 2018, 9:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading