विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राणेंऐवजी भांडारी?

विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राणेंऐवजी भांडारी?

लवकरच विधान परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे. काल रात्री कोअर कमिटीची ही बैठक घेण्यात आली. माधव भांडारीच्या नावाची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते. माधव भंडारी यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची आशा भाजपला आहे.

  • Share this:

मुंबई ,  24 नोव्हेंंबर :  विधानपरिषदेत एका जागेसाठी  भाजपकडून नारायण राणे यांच्या ऐवजी माधव भांडारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. माधव भंडारी हे भाजपचे जुने प्रवक्ते आहेत.

लवकरच विधान परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आहेत.  भाजपच्या  कोअर कमिटीने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते आहे.    काल रात्री कोअर कमिटीची  ही बैठक घेण्यात आली.

माधव भांडारीच्या नावाची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते. माधव भांडारी  यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळण्याची आशा भाजपला आहे.

या निर्णयामुळे आता राणे काय करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच राणेंनी काँग्रेस सोडून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर आता हुसेन दलवाई यांनी राणेंना पुन्हा  कांग्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. आता या निर्णयानंतर राणे काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 12:20 PM IST

ताज्या बातम्या