मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्या मदन शर्मांना राज्यपाल भेटणार!

मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणाऱ्या मदन शर्मांना राज्यपाल भेटणार!

कांदिवली इथं राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यंगचित्र काढणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली. या प्रकरणामुळे भाजपने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आता मदन शर्मा हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

कांदिवली इथं राहणारे माजी नौदल अधिकारी असलेल्या मदन शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या  प्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आणि जामीन मिळाला आहे. यामध्ये 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश होता. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजपने या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले होते.

राम मंदिरासाठी लागणार 'पिंक स्टोन', पण राजस्थान सरकारने खाणीचे काम थांबवले

आज माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे राजभवनावर जाऊन  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे.  दुपारी 12 वाजता इतर माजी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे.

दरम्यान,  शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेनेची भूमिका मांडत शिवसैनिकांची पाठराखण केली.

'माजी नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा संतप्त आणि उत्स्फूर्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हल्लेखोरांना तात्काळ अटकही करण्यात आली. विरोधी पक्षाने या घटनेचं राजकीय भांडवल करावे हे दुर्देवी' असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कोरोना लशीबाबत महत्त्वाची माहिती लपवत आहेत कंपन्या, तज्ज्ञांनी केलं अलर्ट

तसंच, 'संयम दोन्ही बाजूने पाळला पाहिजे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्राच्या नावाखाली स्वैराचार झाला तर लोकांचा संयमाचा बांध तुटतो. म्हणून सर्वांनी जबाबदारी वागलं पाहिजे नाहीतर समाजात तणाव निर्माण होऊ शकतो', अशी शिवसेनेची भूमिकाही संजय राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली.

Published by: sachin Salve
First published: September 15, 2020, 9:25 AM IST

ताज्या बातम्या