Home /News /mumbai /

Mumbai : पब्लिक रिलेशन ऑफिसर व्हायचंय? मुंबई विद्यापीठात सुरू झालीय प्रवेश प्रक्रिया, असा करा अर्ज

Mumbai : पब्लिक रिलेशन ऑफिसर व्हायचंय? मुंबई विद्यापीठात सुरू झालीय प्रवेश प्रक्रिया, असा करा अर्ज

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी, समाजाशी संबंधित लोक, करोडपती पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल्सची स्वत:ला चांगल्या प्रकारे प्रमोट करण्यासाठी नियुक्ती करतात. त्यामुळे मुंबई विद्यापीठात पब्लिक रिलेशनमध्ये मास्टर्सला प्रवेश घ्या.

  मुंबई, 27 जून : पब्लिक रिलेशन ही एक विचारबद्ध, धोरणात्मकरित्या उत्तम सुसंवाद स्थापित होण्याकरिता केलेली एक नियोजनबद्ध प्रक्रिया. भारतामध्ये पब्लिक रिलेशनला एक खूप चांगला करिअर विकल्प म्हणून पाहिले जाते. मास मीडिया सूरु झाल्यानंतर साधारणत पब्लिक रिलेशनकडे तरुणाचा ओढा हा वाढत गेला. त्यामुळं करिअरचा पर्याय म्हणून विद्यार्थी याकडे पाहू लागले आहेत. पदवीनंतर तुम्ही ही पब्लिक रिलेशन या कोर्समध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असाल तर मुंबई विद्यापीठात (Mumbai university) मास कम्युनिकेशन या विभागात पदव्युत्तर एम. ए. इन पब्लिक रिलेशन (M.A in public relations course in Mumbai University) हा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. काय आहे यामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया? जाणून घेऊया... या कोर्सची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे ऑनलाईन पद्धतीने असेल. प्रवेश परीक्षा ही 20 जुलै पर्यंत होण्याची शक्यता आहे. 15 जुलै पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्यानंतर मुलाखत असेल आणि मेरिटवर प्रवेश दिला जाईल, असे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप यांनी सांगितले. 1 ऑगस्ट परिक्षा दिल्यानंतर हा कोर्स सुरू होणार आहे. हा कोर्स 2 वर्षाचा असेल यामध्ये 4 सेमीस्टर असणार आहेत. या कोर्ससाठी फीस 1 लाख असणार असून 20 विद्यार्थ्यांना प्रेवश दिला जाईल. आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार दिले जाणार आहे. 50 टक्के खुल्या वर्गासाठी असणार असून 50 टक्के मागासवर्गींसाठी असणार आहे.  सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. इंस्ट्रक्शन लँग्वेज इंग्लिश असणार असून विद्यार्थी इंग्लिश, मराठी किंवा हिंदीमधून पेपर लिहू शकता. वाचा : Eknath Shinde : सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना फटकारले, मुंबईत याचिका का दाखल केली नाही? विद्यार्थ्यांना सुविधा काय आहेत? हॉस्टेल, अद्यावत लॅब, उच्चशिक्षित शिक्षक, अभ्यास साहित्य इत्यादी विद्यार्थ्यांना  मिळणारं आहे. विद्यार्थ्यांना मिळणारे फायदे 100 टक्के जॉबच्या संधी असून प्लेसमेंट मिळणारं आहे. 

  गुगल मॅपवरून साभार...

  फार्म कसा भराल? या कोर्सचा ॲडमिशन किंवा फाॅर्म भरण्यासाठी https://forms.gle/s81XNPcsxW2q1PDw8 या लिंकवर क्लिक करा. अधिक माहितीसाठी  dcjadmissions2022@gmail.com यावर ईमेलआयडीवर संपर्क साधू शकता. तसेच सविस्तर माहितीसाठी www.dcjmumbai.mu.ac.in या वेबसाईटला भेट द्या. संवाद आणि पत्रकारिता विभाग, दुसरा मजला, आरोग्य केंद्राची इमारत, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र या पत्त्यावरही भेट देऊ शकता. तसेच 022 2652 6068 किंवा 02226526069 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

  BREAKING : सत्तासंघर्षादरम्यान संजय राऊतांना आणखी एक धक्का; ईडीचं समन्स, चौकशीसाठी बोलावलं

  शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे? सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी, समाजाशी संबंधित लोक, करोडपती पब्लिक रिलेशन्स प्रोफेशनल्सची स्वत:ला चांगल्या प्रकारे प्रमोट करण्यासाठी नियुक्ती करतात. जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अफेअर्स किंवा एक्सटर्नल अफेअर्स विभागात या क्षेत्रात चांगली नोकरी मिळू शकते.
  First published:

  Tags: Education, Mumbai

  पुढील बातम्या