ले. कर्नल पुरोहित सेवेत रूजू ; लष्कराकडून 15 दिवसांची रजा मंजूर

ले. कर्नल पुरोहित सेवेत रूजू ; लष्कराकडून 15 दिवसांची रजा मंजूर

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु असल्याने त्यांना सध्या मुंबईतच पोस्टिंग देण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई,24 ऑगस्ट: तब्बल 9 वर्षं कारावास भोगल्यानंतर ले.कर्नल पुरोहित यांची काल जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ते लगेच लष्करी सेवेत रूजूही झाले आहेत आणि त्यांना 15 दिवसांची रजाही मंजूर झाली आहे.

एनआयए कोर्टातली आजची सुनावणी संपली आहे. ले. कर्नल पुरोहित यांना लष्करी सेवेत पुन्हा रुजू करुन घेण्यात आलं असलं तरी मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु असल्याने त्यांना सध्या मुंबईतच पोस्टिंग देण्यात आलंय. त्यांना सध्या डी.व्ही म्हणजेच डिसीप्लिन अॅन्ड व्हिजिलन्स बंदीवर ठेवण्यात आलंय. या खटल्यातून निर्दोष सुटेपर्यंत त्यांना कुठल्याही पदावर बढती मिळणार नाही. बढतीसाठी कुठला कोर्सही ते करु शकणार नाहीत. असं असलं तरी पगार मात्र त्यांना मिळणार आहे.

First published: August 24, 2017, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading