Home /News /mumbai /

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; चक्रीवादळाचा धोका वाढला, महाराष्ट्रालाही इशारा

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र; चक्रीवादळाचा धोका वाढला, महाराष्ट्रालाही इशारा

सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Weather Alert: सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा (low pressure area) येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 25 सप्टेंबर: गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा (low pressure area) येत्या 12 तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण (cyclone in bay of bengal) झाला आहे. याचा परिणाम म्हणून आजपासून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (rain in maharashtra) आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या 12 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा किनाऱ्याच्या दिशेने सरकणार आहे. हेही वाचा-आता चीनजवळच्या लाओस देशात वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानं खळबळ याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबईसहित कोकणातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-Explainer : कोरोना लस एक असली तरी त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा का होतो? परतीच्या पावसाचा होणार उशीर जून महिन्यात मान्सूनने दिमाखात आगमन केल्यानंतर, राज्यात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. पण यंदा परतीच्या पावसाचा काहीसा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 8 ऑक्टोबरपासून राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही उशीरा परतीचा पाऊस दाखल होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या