Home /News /mumbai /

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र; राज्यात 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र; राज्यात 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आज राज्यात एकूण 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज राज्यात एकूण 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Weather Forecast: बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आज आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे आज राज्यात तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसगारात (bay of bengal) हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र (low pressure area) निर्माण झालं आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी (heavy rainfall in maharashtra) लागली आहे. तर मराठवाडा आणि घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. बंगलाच्या उपसागरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आज आणखी तीव्र झालं आहे. त्यामुळे आज राज्यात तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं आज राज्यात मुंबईसह, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज अवघे तीन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र पावसाचे इशारे देण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-तिसऱ्या लाटेच्या तोंडावर मुंबईत रक्ताचा महातुटवडा; टाटा रुग्णालयाकडून 'हे' आवाहन आज कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. उद्याही राज्यात पावसाची स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच राहण्याची शक्यता आहे. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र उद्यापासून उत्तरेकडे सरकेल. त्याचा परिणाम म्हणून राज्यात उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार आहे. पण आज राज्यभर पावसाचा तुफान हजेरी लागणार आहे. तर कोकणात आणि घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हेही वाचा-लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक, वाचा नव्या संशोधनातील ठळक बाबी उद्या मुंबईस ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असून या जिल्ह्यांना उद्याही हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या