समाजाची परवा न करता त्याच्या बाळाला जन्म दिला, 'ती'ची कहाणी ऐकून वर्दीतला माणूसही रडला!

समाजाची परवा न करता त्याच्या बाळाला जन्म दिला, 'ती'ची कहाणी ऐकून वर्दीतला माणूसही रडला!

त्याच्या घराच्यांच्या प्रतिष्ठेला कुठेही डाग लागू नये याकरता या तरुणी तिच्या कुटुंबासह राहत ठिकाणं सोडलं होतं

  • Share this:

अजित मांढरे,प्रतिनिधी

मुंबई, 03 मार्च : नऊ महिने गर्भात ठेवून एका हाडामासाच्या गोळ्याला जन्म द्यायचा... याचं महत्त्व किती असतं हे एक आईच सांगू शकते. पण, ज्या हाडामासाच्या गोळ्याला जगण्याचा अधिकार दिला त्याला स्विकारणाराच समोर आला नाही. मग  त्याला जगवायचं कसं, समाज काय म्हणेल, आपलं काय होईल? या विवंचनेतून एका तरुणीने त्या बाळाला स्मशानभूमीत सोडून दिलं. जेव्हा पोलिसांनी या बाळाची आई शोधून काढली आणि तिची कहाणी ऐकली तेव्हा वर्दीतला हा माणूसही निशब्द रडला.

'प्यार, इश्क और धोखा...'असा काहीसा प्रकार घडलाय मुंबईत. गेल्या आठवड्यात मुंबईतील चंदनवाडी स्मशाभूमी बाहेर सुरक्षा रक्षकाच्या खुर्चीवर एक नवजात बाळ रडताना आढळलं. सुरक्षा रक्षकाने तात्काळ मुंबई पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस त्या नवजात बालकाला घेऊन गेले. मात्र, या नवजात बाळाची आई कोण? याचा तपास करायचा तरी कसा असा प्रश्न एल टी मार्ग पोलिसांना पडला. स्मशानभूमीत एका नवजात शिशूला सोडून जाताना एक आई सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

चंदनवाडी स्मशानभूमीवर बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हातात पिशवी घेतलेला एक १४ ते १६ वर्षांचा मुलगा, त्याच्या सोबत त्याची आई आणि एक २२ वर्षांची तरुण मुलगी जिच्या हातात एक नवजात बाळ असल्याचं आढळून आलं होतं.

याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पुढे आणखी तपास केला असता मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनवर हेच तिघे नवजात बाळाला घेऊन जाताना दिसले. मात्र, मुंबई सेंट्रल येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र, त्या मुलीच्या हातात लहान मुल दिसलेच नाही आणि सीसीटीव्हीत देखील तिघांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते.

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले पण त्यातून त्यांच्या हाती काहीच लागले नाही. हे लक्षात आल्यावर ३० जानेवारीपूर्वी मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालयात किती महिलांची प्रसूती झाली याची यादी घेऊन प्रत्येक आईची चौकशी सुरू केली. अखेर भांडुपमधील एका इस्टेट एजंटच्या मोबाईल नंबर वरुन त्या नवजात बाळाची आई सापडली. वाळवंटातून सुई शोधावी तसं मुंबई पोलिसांच्या एल टी मार्ग पोलिसांनी कोणताही धागादोरा नसताना नवजात बाळाच्या आईला अटक केली. मात्र, तिने जी कहाणी सांगितली ती ऐकून त्या आईची चौकशी करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचे देखील डोळे पाणावले.

अटक केलेल्या तरुणी ही जोगेश्वरी येथील राहणारी आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर तिचे प्रेम होते. या दरम्यान दोघांचे शारिरीक संबंध झाले. त्यातून ती तरुणी गरोदर राहिली. म्हणून ती लग्नाकरता तरुणाच्या मागे लागली. पण प्रियकराने लग्नास नकार दिला. मात्र, पोटातील बाळाला जन्म द्यायचा असं तरुणीने ठरवलं.

पण, प्रियकर आणि त्याच्या घराच्यांच्या प्रतिष्ठेला कुठेही डाग लागू नये याकरता या तरुणी तिच्या कुटुंबासह जोगेश्वरी सोडून भांडुपला राहायला गेली आणि बाळाला जन्म दिला. पण, त्या बाळाचे पालन पोषण आपण करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्या बाळाला कुठे तरी सोडून द्यायचे तिने ठरवलं आणि जड अंतकरणाने तिनं चंदनवाडी स्मशानभूमी जवळ सुरक्षा रक्षकांच्या खुर्चीवर बाळाला ठेवून ती निघून गेली.

ही कहाणी तिच्या तोंडून ऐकल्यावर खाकी वर्दीतील पोलिसांनाही अश्रू अनावर झाले. पोलिसांनी या प्रकरणी तिच्या प्रियकराला गाठलं आणि ताब्यात घेतलं. त्याविरोधात गुन्हा दाखल करून प्रियकराला फसवणूक आणि बलत्काराच्या गुन्ह्या खाली अटक केली.

सध्या त्या बाळाला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी बाल कल्याण समितीला त्याविषयी माहिती दिली.

First published: March 3, 2020, 8:39 PM IST

ताज्या बातम्या