मुंबईत लव्ह जिहाद प्रकार, धर्मांतरासाठी पतीकडून मारहाणीचा माॅडेलचा आरोप

मुंबईत लव्ह जिहाद प्रकार, धर्मांतरासाठी पतीकडून मारहाणीचा माॅडेलचा आरोप

धर्म परीवर्तन करण्यास नकार दिला म्हणून तिला मारहाण देखील करण्यात आली असा आरोप या महिलेनं केलाय.

  • Share this:

18 नोव्हेंबर : मुंबईत लव्ह जिहादचा पुन्हा एका मुद्दा समोर आला आहे. एका मॉडेलने आपल्या पतीवर बळजबरीने धर्मपरीवर्तन करण्याचा आरोप केलाय. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालीये.

मुंबईच्या वांद्रे येथे राहणारी मॉडल रश्मी शहबाजकर हीनं आपल्या पतिवर धर्मपरीवर्तन करण्यासाठी दाबाव टाकल्याचा आरोप करत पोलीसात तक्रार दाखल केली आहे. धर्म परीवर्तन करण्यास नकार दिला म्हणून तिला मारहाण देखील करण्यात आली असा आरोप या महिलेनं केलाय.

मॉडेल रश्मी आणि तिचा पती असिफ याचे बारा वर्षापूर्वी लग्न झाले. पहिल्या 3 वर्षांत सर्वकाही सुरळीत होतं मात्र तीन वर्षानंतर असिफनं रश्मीस तिचा धर्मा परीवर्तन करण्यास दाबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तिला मारहाण देखील करण्यास सुरुवात केली.

मात्र, अखेर असिफच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावेळी असिफनं देखील रश्मीच्या विरोधात तक्रार दाखल केलीये. पोलीस या प्रकाणात तपासणी करत असून या प्रकरणात आणखी काही वेगळा अॅँगल आहे का याचा देखील पोलीस तपास करतं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2017 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...