• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • 'कंगनाच्या हाती कमळ', नव्या बदलाचे संकेत? Viral Video मुळे चर्चेला उधाण

'कंगनाच्या हाती कमळ', नव्या बदलाचे संकेत? Viral Video मुळे चर्चेला उधाण

हा व्हिडीओ काही वेळातचं खूप व्हायरल झाला आहे, कंगनाच्या हातात कमळ पाहून नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत

 • Share this:
  मुंबई, 13 सप्टेंबर : कंगना प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेल्या वादामध्ये आज अभिनेत्री कंगना रणौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळेचा एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेत्री कंगना रणौतने आज रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जवळपास 45 मिनिटं कंगना आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झाली. बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत, कंगनाने चर्चा केली. कंगना आणि राज्यपाल यांच्या बैठकीवेळी, कंगनाची बहीण रंगोलीही उपस्थित होती. 'माझ्यावर जो अन्याय झाला, त्यासंदर्भात मी राज्यपालांची भेट घेतली. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. मी कोणी राजकारणी नाही, माझं म्हणणं राज्यपालांनी एका मुलीप्रमाणे ऐकून घेतलं,' अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर कंगनाने दिली आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाच्या हातात कमळाचं फुल दिसत आहे. कंगनाचा हे कमळाचं फुल कोणी दिलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी कंगनाला भाजप पाठिंबा असल्याचा वारंवार आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंगनाच्या हातातील फुल पाहून अनेकांचे डोळे मोठे झाले आहे. यापूर्वीदेखील सोशल मीडियावर कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र कंगनाने कोणत्याही पक्षात जाणार नसल्यासं सांगितलं होतं..अशा परिस्थितीत कंगनाच्या हातातील कमळाचं फुल कोणत्या गोष्टीचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कंगना आपल्या सोशल मीडियावरुन पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कामाचं कौतुक करते. मुळात घरात काँग्रेसची पार्श्वभूमी असताना कंगनाने नेहमीच मोदींना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: