मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'आप'ला महाराष्ट्र! ग्राम पंचायत निवडणुकीत AAP ला लॉटरी; 50 टक्के जागांवर मिळालं यश

'आप'ला महाराष्ट्र! ग्राम पंचायत निवडणुकीत AAP ला लॉटरी; 50 टक्के जागांवर मिळालं यश

आप पक्षाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सातारा, बीड सारख्या जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.

आप पक्षाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सातारा, बीड सारख्या जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.

आप पक्षाने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सातारा, बीड सारख्या जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते.

    मुंबई, 19 जानेवारी : महाराष्ट्रात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत (Gram panchayat Election) आम आदमी (AAP) पक्षदेखील चांगल्या जागा मिळवू शकला आहे. महाराष्ट्रातील आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यावर म्हणाल्या की, आम्ही राज्यातील तब्बल 100 जागांवर निवडणूक लढली होती, त्यापैकी 50 हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. हा आकडा अधिक वाढू शकतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात सर्वाधिक जागा आपने जिंकल्या आहेत. (AAP in Gram Panchayat elections Success in 50 percent ) तसं पाहता आपने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सातारा, बीड सारख्या जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. केजरीवालांनी केलं कौतुक आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही महाराष्ट्रातील पक्षाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील हा निवडणुकीचा समर स्थानिक पार्टींसाठी खूप महत्त्वपूर्ण होता. यामध्ये भाजतीय जनता पार्टीने मतमोजणीच्या निष्कर्षानुसार सर्वाधित जागा जिंकल्या आहेत. भाजपने 3263 जागांवर पुढे आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 2999 जागांवर पुढे असून दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर कालपर्यंत पहिल्या क्रमांकवर असलेली शिवसेना आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. (AAP in Gram Panchayat elections Success in 50 percent ) शिवसेनेच्या पारड्यात सध्या 2808 जागा पडत असल्याचं दिसून येत आहे.काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात 2151 जागा सध्यातरी पडू शकतील असे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 38 जागांवर दिसून येत आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील बातमी दिली आहे. हे ही वाचा-अभ्यासावरुन बापाने मुलाला दिली भयंकर शिक्षा; कान पकडून उठाबशा काढायची आली वेळ दरम्यान राज्यभरातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकाल जाहीर होत असून विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला जात आहे. मात्र वातावरणात तणाव निर्माण होऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक निकालानंतर मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: AAP, Arvind kejriwal, Election, Gram panchayat

    पुढील बातम्या