खुशखबर! सिडको काढणार तब्बल 15 हजार 152 घरांची लॉटरी

खुशखबर! सिडको काढणार तब्बल 15 हजार 152 घरांची लॉटरी

या सर्व घरांची किंमत 15 लाख ते 22 लाखांपर्यंत असणार आहे.

  • Share this:

22 डिसेंबर: सिडकोसाठी नवी मुंबईत नवीन वर्षांत सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. सिडको नवी मुंबईत तब्बल 15 हजार 152 घरे येत्या एप्रिल महिन्यात लॉटरी काढणार आहे. या सर्व घरांचा ताबा सिडको 2019 च्या डिसेंबर पर्यंत देणार आहे.

नवी मुंबईतील घणसोली, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी आणि खारघर या विभागात सिडको एकूण 15 हजार 152 घरे उभारतेय.

यामधील 8500 घरे ही एकट्या तळोजा क्षेत्रात उभारली जाणार आहेत. सर्व घरे ही 350 ते 450 चौरस फुटांची असणार आहेत.  या सर्व घरांची किंमत 15 लाख ते 22 लाखांपर्यंत असणार आहे.

तळोजातील 8500 घरांपैकी 40 टक्के घरं पंतप्रधान आवास योजनेची असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरे उभारली जाणार आहेत. ही सर्व घरे प्री फॅब पद्धतीने उभारली जाणार आहेत. यापैकी तळोजा येथील 8 हजार 500 घराच्या कामांना पुढील महिन्यात प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे..

सिडको पुढील 5 वर्षांत 52 हजार 470 घरांची लॉटरी काढणार आहे. जी पुढील 10 वर्षात उभारली जाणार आहे. मात्र ही सर्व घरे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी असणंर आहेत. ृ

First published: December 22, 2017, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading