'MHADA साठी कोणत्याही आमिषांना बळी पडू नका'; अजित पवारांनी खुली केली 5,647 घरांची सोडत

'MHADA साठी कोणत्याही आमिषांना बळी पडू नका'; अजित पवारांनी खुली केली 5,647 घरांची सोडत

'म्हाडा'च्या (MHADA)पुणे विभागातल्या साडेपाच हजारांहून अधिक घरांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : वाजवी दरात हक्काचं घर घेण्याची संधी म्हाडाच्या योजनांमुळे मिळते. म्हाडाच्या पुणे विभागातल्या 5,647 सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. या घरांची नोंदणीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. "म्हाडाची सोडत अत्यंत पारदर्शी पद्धतीने होते. त्यामुळे घर मिळवून देतो अशा भूलथापांना आणि आमिषांना बळी पडू नका," असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 5 हजार 647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी आरंभ करण्यात आला. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सदनिका आणि भूखंडांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना हक्काची घरे माफक किंमतीत मिळणार आहेत. राज्यातील सर्वांना हक्काची घरे मिळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे."

कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा चांगला परिणाम दिसत असून घरांच्या खरेदी-विक्रीत वाढ झाली आहे.

'म्हाडा'च्या योजनांच्या माध्यमातून दर्जेदार आणि माफक किंमतीत घरं मिळण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

First published: December 10, 2020, 8:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading