कमला मिल अग्नितांडव: 3 आरोपींची शोधमोहीम सुरू

कमला मिल अग्नितांडव: 3 आरोपींची शोधमोहीम सुरू

क्रिपेश सांघवी, जिगर सांघवी आणि अभिजीत मानकर अशी या तीन आरोपींची नावं आहेत

  • Share this:

30 डिसेंबर:  कमला मिल आगप्रकरणी ३ आरोपींसाठी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जाहीर केली आहे.   देशातल्या सर्व विमानतळांनाही सतर्क करण्यात आलंय, कारण हे तीनही आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

वन अबव्ह हॉटेल ज्या कंपनीचं आहे, त्या कंपनीचे तीन संचालक सध्या फरार आहेत. क्रिपेश सांघवी, जिगर सांघवी आणि अभिजीत मानकर अशी या तीन आरोपींची नावं आहेत. सिग्रिड ऑस्पिटालिया अँड एंटरटेनमेंट असं या कंपनीचं नाव आहे.  कमला मिलच्या वन अबव्ह पब आणि  मोजो हॉटेलमध्येच आग लागली होती.

या आगीत जवळपास 22 जण जखमी झाले तर 15 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात तरूणांचं प्रमाण अधिक  होतं.गुरूवारच्या मध्यरात्री 12.30 च्या  सुमारास ही आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळवलं.पण निष्काळजीपणामुळे ही आग  लागल्याचा आरोप सध्या केला जातोय. याप्रकरणी महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलंय. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे.

कमला मिल प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याचा निश्चय सरकारने घेतला आहे. पण अशा घटना पुन्हा घडणारच नाही यासाठी काय पाउलं उचलली जाणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading