लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा उलगडा,एक आरोपी अटक

लोणावळा दुहेरी हत्याकांडाचा उलगडा,एक आरोपी अटक

लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.

  • Share this:

11 जून : लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

२ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पाॅइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे आणि पुणे जिल्हातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी -विद्यार्थिनी यांचा अंगातील कपडे काढून दगडाने आणि अज्ञात हत्याराने डोक्यात,शरीरावर वार करून खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकिस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ आणि परिसर पिंजून काढला.

खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा कसोशीने सुरू होता. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील विविध दारू अड्ड्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. आज रविवारी पहाटे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचं समजते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 01:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading