किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष!

भाजपचे वाचाळवीर खासदार किरीट सोमय्या समोरच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च: भाजपचे वाचाळवीर खासदार किरीट सोमय्या समोरच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सोमय्या यांची तक्रार केली आहे. राज्यात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एक झाले आहेत. पण ईशान्य मुंबईत युतीत मीठाचा खडा टाकणाऱ्या किरीट सोमय्यांना तिकिट देऊ नका, अशी मागणीच शिवसैनिकांनी केली आहे.

शिवसैनिकांच्या आक्रमक विरोधामुळे भाजपकडून ईशान्य मुंबईची उमेदवारी अजुनही घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतायत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित-

SPECIAL REPORT : शिवसैनिकांपुढे भाजप नरमलं, सोमय्यांऐवजी छेडा मैदानात?

VIDEO : शिवसैनिकांच्या विरोधावर किरीट सोमय्या म्हणतात...

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

VIDEO: 'मी सुद्धा बारामतीचीच लेक आणि दौंडची सून'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 27, 2019 08:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading