News18 Lokmat

आघाडीत धुसफूस कायम, अबू आझमींनी मागितली भिवंडीची जागा

घटक पक्षांची नाराजू दूर करून त्यांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीला करावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 10, 2019 04:52 PM IST

आघाडीत धुसफूस कायम, अबू आझमींनी मागितली भिवंडीची जागा

मुंबई 10 मार्च  : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना आघाडीतल्या घटक पक्षांच्या मागण्या काही कमी होण्याची शक्यता दिस नाही. समाजवादी पक्षाने भिवंडीच्या जागेची मागणी केली असून काँग्रेस ही जागा द्यायला तयार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या आधी राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी पक्ष आघाडीतून बाहेर पडला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची रविवारी पुन्हा बैठक झाली. त्यात घटक पक्षांना द्यावयाच्या जागांवर चर्चा झाली. यात अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाने भिवंडीच्या जागेची मागणी केल्याने अडचण निर्माण झालीय. काँग्रेसने  भिवंडी ऐवजी समाजवादी पार्टीला जालना लोकसभा जागा देण्याची तयारी दाखवली मात्र सपा भिवंडीसाठीच आग्रही  आहे.

त्यामुळे घटक पक्षांची नाराजू दूर करून त्यांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीला करावं लागणार आहे. नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी 19 फेब्रुवारीला सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असल्याचं दोनही नेत्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातली 2014 ची स्थिती

लोकसभेच्या एकूण जागा - 48

Loading...

भाजप - 22

शिवसेना - 18

राष्ट्रवादी - 05

काँग्रेस - 02

इतर - 01


महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. या निवडणुकीत  भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. तर विधानसभेत मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार आहेत. युतीत काही अडचणी आल्यास उद्धव ठाकरे आणि अमित शहा त्यावर मार्ग काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. विधानसभेत सरकार आल्यास सर्व मंत्रिमंडळात भाजप आणि शिवसेनला सारख्याच जागा मिळतील असंही त्यांचं ठरलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...