मुंबई, 23 मार्च : ''सोलापुरात महालक्ष्मीचा आर्शिवाद घेऊन आपण उद्यापासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करणार होतो. पण शिवरायांच्या आर्शिवादाने आजच निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली,'' असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. शिवजयंतीनिमित्त मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परीसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी सेनेच्यावतीने आयोजित करण्याच आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ''उद्यापासून राजकीय धुळवड सुरू होणार आहे. या धुळवडीत अनेक रंग उधळले जातील. पण भगवा रंग केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापणार,'' असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Loksabha election 2019, Shivjayanti, Shivsena, Uddhav thakre