घटक पक्षांचे बंड झाले थंड, मुख्यमंत्र्यांनी फिरवली जादूची कांडी!

घटक पक्षांचे बंड झाले थंड, मुख्यमंत्र्यांनी फिरवली जादूची कांडी!

मुख्यमंंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा यशस्वीपणे जादूची कांडी फिरवून घटकपक्षांना युतीतून बाहेर जाण्यापासून रोखलं आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाला उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी युतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. परंतु, संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर जानकरांनी यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा यशस्वीपणे जादूची कांडी फिरवून घटकपक्षांना युतीतून बाहेर जाण्यापासून रोखलं आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर होताच घटकपक्षांमध्ये नाराजीचा उद्रेक झाला. बारामतीतून जागेकडे डोळा लावून असलेल्या महादेव जानकर यांच्या पदरी निराशा आली. दौंडचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महादेव जानकर यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी संध्याकाळपर्यंत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार अशी घोषणाच करून टाकली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटकपक्षांची मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला रामदास आठवले, विनायक मेटे, महादेव जानकर यांच्यासह इतर नेते हजर होते. फडणवीस यांनी सर्व घटकापक्षांची समजूत काढण्यात यश मिळवलं आहे.

या बैठकीनंतर न्यूज18 लोकमतशी बोलताना महादेव जानकर यांनी यू-टर्न घेतला. एनडीए समवेत पक्षीय पातळींवर चर्चा झाली. एनडीए सरकार पुन्हा येण्यासाठी काय करता येईल याची चर्चा झाली. घटक पक्षांना सोबत घेऊन काम करू असं आश्वसान मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, अशी माहिती जानकरांनी दिली. तसंच कोल्हापूर इथं सभेचं निमंत्रण आम्हास दिलं आहे. आम्ही या मेळावा उपस्थित राहणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांची नाराजी असते ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे, देशात पोषक वातावरण असताना मित्र पक्ष काही नुकसान झाले तर भरपाई करू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशात सरकार हे नरेंद्र मोदींच्या अंतर्गत कसं येईल यासाठी आम्ही सगळे सभा घेऊ, असंही जानकर म्हणाले.

राहुल कुल हे रासपा आमदार आहे. कांचन कुल या भाजपा उमेदवार आहे. मित्र पक्ष म्हणून आम्हाला बारामती इथं प्रचाराला जावं लागणार आहे असंही जानकरांनी सांगितलं.

=============================================

First published: March 23, 2019, 6:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading