किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती, केंद्रीय मंत्र्याचं नाव चर्चेत

किरीट सोमय्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती, केंद्रीय मंत्र्याचं नाव चर्चेत

सोमय्या यांना पुन्हा तिकीट देण्यास शिवसेना कार्यकर्त्यांचा विरोधा लक्षात घेऊन भाजपने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई, 28 मार्च : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपकडून यावेळी उमेदवारी देण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमय्या यांना पुन्हा तिकीट देण्यास शिवसेना कार्यकर्त्यांचा विरोधा लक्षात घेऊन भाजपने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होत असताना भाजपकडून ईशान्य मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होणार आहे.

दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला आहे. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी  सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींवरून ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार मातोश्रीवरूनच ठरणार हे नक्की झाले आहे.

आजचा दिवस सोमय्या यांच्यासाठी अधिकच अडचणीचा ठरला. प्रथम मातोश्रीने त्यांची भेट नाकारली त्यानंतर सुनिल राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे.  दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्या बाबतचा निर्णय  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मिळून घेणार असल्याचे समजते.

त्याआधी जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी केली होती. काहीही झाले तरी सोमय्या यांना पराभव करु असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या घोषणेमुळे सोमय्या यांना अडचणीत आणखी भर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरी ईशान्य मुंबईतील उमेदवारांवरुन अद्याप गोंधळ आहे. शिवसेनेने या मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना विरोध केला आहे. स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला विरोध केला आहे.

भाजपने जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत शिवसैनिकांचा छळ केला आहे. त्यामुळे आमचा विरोध भाजपला नाही तर सोमय्या यांना आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण जर ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव होईल. भाजपने अन्य कोणालाही उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्या बाजूने असू असेही राऊत म्हणाले.

सोमय्या यांना उमेदवारी मिळालीच तर गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर अपक्ष म्हणून उमेदारीचा अर्ज दाखल करु, असे राऊतांनी सांगितले. आमचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे सोमय्या यांना उमेदवारी मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांना विरोध का?

2017 मधील मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान तसंच यापूर्वीही किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेनेवर अनेकदा टक्केवारी घेण्यावरून टीका करण्यात आली होती. मुंबई महापालिकेत टक्केवारी घेतल्याशिवाय कोणतेही काम दिले जात आहे. वांद्र्यांच्या साहेबांना टक्केवारी जाते, असा थेट आरोप मातोश्रीवर केल्याने किरीट सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची तीव्र नाराजी आहे.

VIDEO: तुमचं नागपूरचं बंडल तिथंच ठेवा - सुप्रिया सुळे

First published: March 28, 2019, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading