भाजपने मुंबईतल्या दोनच जागांवर जाहीर केला उमेदवार; किरीट सोमय्यांची उमेदवारी होल्डवर?

ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या उत्सुक आहेत. पण त्यांच्या नावाला युतीतल्या शिवसेनेकडून विरोध असल्याचं समजतं. भाजपच्या कोट्यातली मुंबईतली तेवढी एकच जागा भाजपने अद्याप जाहीर केलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 09:17 PM IST

भाजपने मुंबईतल्या दोनच जागांवर जाहीर केला उमेदवार; किरीट सोमय्यांची उमेदवारी होल्डवर?

मुंबई, 21 मार्च : भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित उमेदवारी यादी धूलिवंदनाच्या मुहूर्तावर जाहीर झाली.एकूण 20 राज्यांतले 182 उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर केले आहेत. त्यात महाराष्ट्रातल्या 16 उमेदवारांची नावं आहेत. मुंबईतल्या सहा मतदासंघापैकी दोनच जागांवरचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झाले आहेत. त्यामुळे उरलेल्या जागांचा पेच अजून कायम आहे आणि चर्चा सुरू राहणार अशीच चिन्हं आहेत. ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार किरीट सोमय्या उत्सुक आहेत. पण त्यांच्या नावाला युतीतल्या शिवसेनेकडून विरोध असल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर संजय दीना पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण भाजपच्या पहिल्या यादीत ईशान्स मुंबईचा उमेदवार जाहीर झालेला नसल्याने ही लढत स्पष्ट झालेली नाही.

मुंबईतल्या एकूण 6 लोकसभा मतदारसंघांपैकी युतीच्या गणितानुसार 3 जागा भाजपकडे तर 3 शिवसेनेकडे येतात. भाजपच्या कोट्यातल्या 3 पैकी 2 जागांवरचे उमेदवार पहिल्याच यादीत स्पष्ट झाले आहेत. त्यापैकी मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी आणि उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ईशान्य मुंबईतले खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी मात्र अद्याप जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली ते बहुतेक सगळे विद्यमान खासदारच आहेत. नगरची जागा सुजय विखे पाटील  यांना आणि लातूरची सुधाकर भालेराव शृंगारे यांना जाहीर करण्यात आली आहे. हे दोन उमेदवार सोडता बाकी सगळे 2004 चे विजयी खासदारच भाजपने पुन्हा उमेदवार म्हणून दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुभाष भांबरे यांच्यासह बहुतांश विद्यमान खासदारांची नावं या यादीत आहेत. मोदी स्वतः वाराणसीतून तर शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा पत्ता पक्षाने कट केल्याचं उघड झालं आहे.


असे आहेत महाराष्ट्रातील उमेदवार

Loading...


नागपूर - नितीन गडकरी


धुळे- सुभाष भामरे


वर्धा - रामदास तडस


नंदुरबार - हीना गावित


रावेर - रक्षा खडसे


अकोला - संजय धोत्रे


गडचिरोली - अशोक महादेवराव नेते


चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर


जालना - रावसाहेब दानवे


भिवंडी - कपिल पाटील


मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी


उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन


अहमदनगर - सुजय विखे पाटील


बीड - डाॅ. प्रीतम मुंडे


लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे


सांगली - संजयकाका पाटील

--

भाजपचे 182 उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात, UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...