अमित शहांच्या शाही भोजनात उद्धव ठाकरेंसाठी पुरणपोळी

एनडीएतील भाजपनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेदेखील हजेरी लावणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 07:02 PM IST

अमित शहांच्या शाही भोजनात उद्धव ठाकरेंसाठी पुरणपोळी

नवी दिल्ली/मुंबई, 21 मे: लोकसभा निवडणूक 2019साठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे सत्ताधारी भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जवळ-जवळ सर्वच एक्झिट पोलने एनडीएला 300पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एनडीएच्या नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शहांच्या या शाही डिनरसाठी एनडीएतील सर्व पक्षांचे प्रमुख निकालाआधी राजधानी नवी दिल्लीत एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित असणार आहेत.  एनडीएतील भाजपनंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील हजेरी लावणार आहेत.

मतदान झाल्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब परदेश दैऱ्यावर केले होते. मंगळवारी (21 मे) सकाळी ते मुंबईत दाखल झाले आहेत.  उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठकही आहे. त्यामुळे शहांच्या डिनरसाठी शिवसेनेकडून कोण उपस्थित राहणार? याबाबत संभ्रम होता. दिल्लीतील डिनरसाठी कोणी जावे याबाबत उद्धव ठाकरेंनी पक्षातील नेत्यांना कोणतेच आदेश वा सूचना दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा : शिवसेना 3 महिन्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही - सूत्र

उद्धव ठाकरेंसाठी पुरणपोळी बेत पण...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता भोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. भाजपकडून एनडीएतील नेत्यांची आवडनिवड विचारत घेऊन जेवणाचा मेन्यू ठरवण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी अमित शहा यांनी पुरण पोळीचा मेन्यू ठरवला आहे. शहा यांनी या शाही भोजनात 35 प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला आहे. यात प्रत्येक नेत्यांच्या आवडी निवडीचा विचार करण्यात आला आहे. PM मोदींसाठी खास गुजराती थाळी ठेवण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी खास बिहारी चोखा, सत्तू हा मेन्यू ठेवण्यात आला आहे. ईशान्येकडील नेत्यांसाठी खास त्यांच्या आवडीचे पदार्थ तर अकाली दलाच्या नेत्यांसाठी पंजाबी तडका असणारे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

Loading...

वाचा :VIDEO : विवेकवर भडकले अनुपम खेर, म्हणाले...

शाही भोजनाचे आयोजन कशासाठी ?

निकालाच्या आधी बोलावण्यात आलेल्या भोजन कार्यक्रमामागे एनडीएतील सर्व पक्ष एकत्र आहेत, असा संदेश देण्याचा हेतू असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...