S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय - उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकरनं सरकरवर टीका केली आहे.

Updated On: Apr 7, 2019 12:59 PM IST

देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय - उर्मिला मातोंडकर

मुंबई, 07 एप्रिल : काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं आता सरकारवर टीका केली आहे. मागील पाच वर्षात देशानं हुकूमशाहीकडे वाटचाल केली. शिवाय, योग्य काय? हे सरकार ठरवत असल्याची टीका उर्मिला मातोंडकरनं केली आहे. 'न्यूज18'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्मिलानं ही टिका केली आहे. यावेळी तिनं गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांचा देखील उल्लेख केला.

उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकरनं भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना आव्हान दिलं आहे. 2014मध्ये काँग्रेसच्या संजय निरूपमांना याच मतदारसंघातून जवळपास 4 लाखांच्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदाच्या लढतीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सात टप्पांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत.जोरदार प्रचार

सध्या उर्मिला मातोंडकर जोरदार प्रचार करताना दिसत आहे. त्यासाठी तिनं काही फंडे देखील वापरले. केव्हा रिक्षा चालवून तर केव्हा सोसायटीतील मुलांशी संवाद साधत उर्मिला मातोंडकर प्रचार करत आहे. तिच्या प्रचाराला देखील सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार देखील उर्मिला मातोंडकर पाडव्यानिमित्त निघालेल्या रॅलीत सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं नागरिकांशी संवाद देखील साधला होता.

दरम्यान, 2014चा निकाल पाहता गोपाळ शेट्टी यांना निवडणूक फारशी कठिण नाही असं म्हटलं जात होतं. पण, आता उर्मिला मातोंडकरच्या आव्हानानं या लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. राज ठाकरे उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी सभा घेणार अशी चर्चा होती. पण, राज यांनी त्याला नकार दिला आहे.


VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close