शरद पवार - उर्मिला मातोंडकर भेटीत काय झाली चर्चा?

उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 11:27 AM IST

शरद पवार - उर्मिला मातोंडकर भेटीत काय झाली चर्चा?

मुंबई,  प्रफुल्ल साळुंखे, 11 एप्रिल : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये राज्यातील सात जागांचा देखील समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. पण, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप देखील बाहेर आलेला नाही. यानंतर बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांची भेट ही सदिच्छा भेट होती. त्यांनी मला आशिर्वाद दिल्याची प्रतिक्रिया दिली. उर्मिला मातोंडकर यांनी भाजपचे खासदार विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे या लढतीकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यापूर्वी अभिनेता गोविंदा देखील याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय झाले होते. त्यामुळे 2019मध्ये उर्मिला मातोंडकर यांची जादू चालणार का? हे पाहावं लागणार आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी

Loading...

राज्यात लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. तर, शिवसेना - भाजपची युती झाल्यानं निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर उर्मिला मातोंडकर यांनी प्रचाराला जाणार असल्याचं म्हटलं. सध्या उर्मिला मातोंडकर यांना प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता उत्तर मुंबईतील चुरस वाढली आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी प्रचार सभा घेणार असल्याची चर्चा होती. पण, राज यांनी मात्र ही बातमी फेटाळून लावली आहे. प्रचारासाठी देखील उर्मिला मातोंडकर या नव नवीन फंडे वापरताना दिसत आहेत. शिवाय, त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार असून त्यानंतर सारं चित्र स्पष्ट होईल.


VIDEO: नितीन गडकरींनी मतदानानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 11:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...