लोकसभा निवडणूक 2019 : बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

लोकसभा निवडणूक 2019 : बंद कर रे तो टीव्ही; राज ठाकरे ट्रोल

लोकसभा निवडणुकीचे सध्याचे कल पाहता आता राज ठाकरेंना सोशल मीडिया ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल पाहता आता देशात भाजपप्रणित NDAची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. राज्यात देखील भाजप – शिवसेना युतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. पण, या साऱ्या घडामोडीमध्ये राज ठाकरे मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात सभा घेत सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. पण, आता त्यांच्या या डायलॉगवरून राज ठाकरेंना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. आता बंद कर रे तो टीव्ही अशा मीम्स तयार करत राज ठाकरेंना ट्रोल केलं जात आहे.

राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेनंतर भाजपनं देखील त्यांना त्यांना उत्तर दिलं होतं. पण, राज ठाकरेंच्या सभांमुळे राज्यात चित्र पालटेल असं बोललं जात होतं. पण, आता हाती येत असलेले कल पाहता मात्र तसं काहीच झालेलं दिसत नाही.  त्यावरून आता राज ठाकरेंना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे.

VIDEO : सेनेच्या वाघाने पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीची रोखली वाट, अजितदादांना दिलं हे चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 01:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading