मुंबई, 23 एप्रिल: नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणजे देशावरचे संकट असून कोणत्याही परिस्थितीत हे दोघे देशाच्या राजकीय क्षितीजावर दिसता कामा नयेत. यासाठी शिवसेनेला देखील मतदान करू नका कारण सेनेला मतदान म्हणजे या दोघांना मत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत आवाहन केले. आतापर्यंत राज्यातील विविध शहरांमध्ये सभा घेतल्यानंतर राज यांची मुंबईतील पहिली सभा दक्षिण मुंबईच्या काळाचौकी भागातील शहीद भगतसिंग मैदानात झाली.
या सभेत राज यांनी प्रथम मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शहीद जवानांच्या नावाने मत मागणारे आमचे PM हे फकीर नसून बेफिकिर असल्याची बोचरी टीका राज यांनी केली. मुंबईतल्या पहिल्याच सभेत राज यांनी शिवसेनेला देखील मतदान करू नका असे आवाहन केले. कारण सेनेला मतदान म्हणजे मोदी-शहा यांना मत असे राज यांनी सांगितले.
काय म्हणाले राज
मुख्यमंत्र्यांना शांत झोप लागावी म्हणून गॅप घेतला
काय उत्तर द्यावे हेच समजत नाही
पवारांनी चालवायला मी काय आता उभा राहिलो काय
प्रश्नांची उत्तरे मिळत नाही म्हणून आरोप होत आहेत
काँग्रेसपेक्षा भाजप नालायक निघाल
भाजप सरकार युपीएपेक्षा जास्त नालायक निघाले
मुख्यमंत्री भांबावलेत, त्यांना काय बोलायचे ते उमजेना
काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांचे वाभाडे काढले होते
आता तुम्ही सत्तेत असताना तुमचे कपडे काढतोय
भाजपच्या नेत्यांमध्ये खोट बोलण्याची स्पर्धा लागली आहे
पवारांच्या दिल्लीतील बंगल्यावर कोण जातंय, उत्तरं द्या
5 वर्ष मोदींनी फक्त खोटा प्रचार केला
मोदींच्या कार्यकाळात सर्वाधिक जवान मारले गेले
खोटा प्रचार करण्यासाठी देशाने बहुमत दिले का?
भाजपच्या IT सेलची कार्टी 'लावारीस'
2014ची मोदींची लाट राहिलेली नाही
पुलवामा हल्लाचा पूर्व इशारा दिला होता, काय केले- राज याचा सवाल
आमचा PM फकीर नाही तर बेफिकीर
वाजपेयींनी कारगिलचा कधी बाजार नाही मांडला
या देशात न्या.लोया यांचा खून होतो?
विरोधक असाल तेव्हा तुमच्यावर धाडी पडतील
नोटबंदीची चौकशी झाली तर 1947नंतरचा सर्वात मोठा घोटाळा ठरेल
शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत
मोदी,शहा देशावरचे संकट
SPECIAL REPORT : 'ढाई किलो का हात भाजप के साथ'