ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक रिंगणात, पक्षाकडून दिले 'हे' आदेश

मनोज कोटक यांनी सोमवारपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 2, 2019 12:35 PM IST

ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक रिंगणात, पक्षाकडून दिले 'हे' आदेश

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 02 एप्रिल : ईशान्य मुंबईचा भाजपच्या उमेदवाराचा तिढा अजूनही कायम आहे. एकीकडे किरीट सोमय्या यांचा प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे मनोज कोटक यांनाही निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना पक्षाकडून देण्यात आली आहे. मनोज कोटक यांनी सोमवारपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता यावर भाजप केंद्रीय निवडणूक समिती काय अंतिम निर्णय देणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांचं नाव पुढे येत आहे. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

ईशान्य मुंबई मतदारसंघातले विद्यमान खासदास किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. त्यामुळे भाजप उमेदवार बदलला, अशी चर्चा आहे. किरीट सोमय्यांची भेट शिवसेनेनं नाकारल्यानंतर सोमय्यांचा पत्ता कट होणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचीही माहिती समोर आली होती.

हेही वाचा: सोनिया गांधींच्या पराभवासाठी भाजप 'या' खासदाराला मैदानात उतरवणार?

Loading...

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला. प्रथम मातोश्रीवरून सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपला देखील कल्पना आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्या यांच्या फोन, मेसेज अशा कोणत्याही गोष्टींना मातोश्रीकडून प्रतिसाद दिला गेला नाही. त्यानंतर प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. पण अखेर आता वेगळ्याच उमेदवाराचं नाव पुढे येत आहे. मनोज कोटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.


VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे



 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...