किरीट सोमय्यांचा पत्ता कट, या नेत्याला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता?

किरीट सोमय्यांचा पत्ता कट, या नेत्याला भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता?

2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेवर हल्ला चढवण्याची जबाबदारी किरीट सोमय्यांनी सांभाळली होती.

  • Share this:

मुंबई 26 मार्च : मुंबईतून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची घोषणा झालीय. तर भाजपचा फक्त एका जागेचा पेच कायम आहे. ती जागा आहे ईशान्य मुंबईची. इथले खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेने कडाडून विरोध केलाय. त्यामुळे या जागेवर भाजप श्रेष्ठी मनोज कोटक यांच्या नावाचा विचार करताहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेवर हल्ला चढवण्याची जबाबदारी किरीट सोमय्यांनी सांभाळली होती. BMCच्या कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली होती. ही टीका करताना त्यांनी 'मातोश्री'लाही टीकेच्या फेऱ्यात घेतलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सोमय्यांना तिकीट दिल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत असा इशाराच त्यांनी दिला होता.

या जागेचा पेच सोडविण्यासाठी मंगळवारी वर्षा आणि मोतोश्रीवरही बैठका आणि चर्चा झाल्या. पर्याय म्हणून महापालिकेतले भाजपचे गटनेते मनोज कोटक यांचं नाव पुढे आलं. त्यामुळेच ईशान्य मुंबईतून कोटक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतल्या एकूण 6 लोकसभा मतदारसंघांपैकी युतीच्या गणितानुसार 3 जागा भाजपकडे तर 3 शिवसेनेकडे येतात. भाजपच्या कोट्यातल्या 3 पैकी 2 जागांवरचे उमेदवार पहिल्याच यादीत जाहीर करण्यातआले होते. त्यापैकी मुंबई उत्तरमधून गोपाळ शेट्टी आणि उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ईशान्य मुंबईतले खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी मात्र अद्याप जाहीर झालेली नव्हती. महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली ते बहुतेक सगळे विद्यमान खासदारच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 06:28 PM IST

ताज्या बातम्या