ईशान्य मुंबईचा तिढा सुटणार : भाजपच्या किरीट सोमय्यांऐवजी आता हे नाव होणार फायनल?

ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार कोण असेल याची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण आता भाजपच्या गोटातून नवीन नाव पुढे येत आहे. या नावाला शिवसेनेकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 03:34 PM IST

ईशान्य मुंबईचा तिढा सुटणार : भाजपच्या किरीट सोमय्यांऐवजी आता हे नाव होणार फायनल?

उदय जाधव

मुंबई, 1 एप्रिल : ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार कोण असेल याची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण आता भाजपच्या मनोज कोटक यांचं नाव पुढे येत आहे. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

ईशान्य मुंबई मतदारसंघातले विद्यमान खासदास किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. त्यामुळे भाजप उमेदवार बदलला, अशी चर्चा आहे.  किरीट सोमय्यांची भेट शिवसेनेनं नाकारल्यानंतर सोमय्यांचा पत्ता कट होणार याची चर्चा सुरू झाली. त्यातच प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा सुरू झाली.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी 'एकच स्पीरीट नो किरीट' हा नारा दिला. प्रथम मातोश्रीवरुन सोमय्या यांची भेट नाकारली त्यानंतर शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

जागावाटपात ईशान्य मुंबई मतदारसंघ भाजपकडे असला तरी या मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मर्जीशिवाय येथे उमेदवार देता येणार नाही याची भाजपला देखील कल्पना आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सोमय्या यांनी जोरदार प्रयत्न केले. पण मातोश्रीवरून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोमय्या यांनी भाजपमधील शिवसेनेच्या मित्रांकडून मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्या यांच्या फोन, मेसेज अशा कोणत्याही गोष्टींना मातोश्रीकडून प्रतिसाद दिला गेला नाही. यातच आता प्रवीण छोडा आणि पराग शहा यांनी ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले होते. पण अखेर आता वेगळ्याच उमेदवाराचं नाव पुढे येत आहे. मनोज कोटक यांचं नाव आज झालेल्या चर्चेत पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

Loading...


VIDEO: हिंदूंचा अपमान करण्याचे पाप काँग्रेसनं केलं; मोदींचं UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...