• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सोमय्या म्हणाले...'मनोज कोटक संपूर्ण देशात पसरवतील ईशान्य मुंबईची शान'
  • VIDEO: सोमय्या म्हणाले...'मनोज कोटक संपूर्ण देशात पसरवतील ईशान्य मुंबईची शान'

    News18 Lokmat | Published On: Apr 4, 2019 11:31 AM IST | Updated On: Apr 4, 2019 11:31 AM IST

    मुंबई, 4 एप्रिल : ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांचं तिकीट कापल्यानंतरही अजिबात नाराज न होता सोमय्या गुरुवारी सकाळी पक्षाचा प्रचार रॅलीत उतरलेत. मनोज कोटक यांच्यासोबत ते प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते. मुलुंड इथल्या प्रतापसिंह गार्डनमध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ''मनोज कोटक हे माझे भाऊच आहेत. ईशान्य मुंबईची शान संपूर्ण देशात पसरविण्याचं काम मनोज कोटक करतील'', असं सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी कोटक यांच्या प्रचाराचे कार्यक्रमही जाहीर केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी