जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईत भरले जाणार उमेदवारी अर्ज

मुंबईतील लोकसभा उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 09:33 AM IST

जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईत भरले जाणार उमेदवारी अर्ज

मुंबई, 08 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता मुंबईत आता सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, आजचा दिवस हा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. कारण, मुंबईतील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. भाजप खासदार पूनम महाजन यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून तर, एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.


शिवसेना - भाजप खासदारांची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली


Loading...

जोरदार शक्तीप्रदर्शन

दुसरीकडे शिवसेनाचे खासदार अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता संजय निरूपम, प्रिया दत्त, उर्मिला मांतोडकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे राहुल शेवाळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. तसेच सकाळपासूनच विविध धार्मिक स्थळांना भेटी देत आर्शिवाद घेतले जाणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळाला देखील शिवसेना उमेदवार भेट देऊन अभिवादन करतील.


VIDEO : गोपनाथ मुंडेंचा राजकीय वारसा, धनंजय आणि पंकजा आमने-सामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 09:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...