भाजप-शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; 25-23चा फॉर्म्युला फायनल होणार?

भाजप-शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; 25-23चा फॉर्म्युला फायनल होणार?

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्या युतीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्या युतीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. युती संदर्भात दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृतपणे काहीच सांगण्यात आले नसले तरी चर्चा सुरु असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये 25-23चे सूत्र निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. चर्चे दरम्यान, शिवसेनेने भिवंडी जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. शिवसेनेने पालघर जागा देखील मागितली होती. पण भाजपने ही जागा आपल्यालाच हवी असल्याचे सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी सेनेसोबत युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे. तर शिवसेनेचे नेते मात्र भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती होणार नसल्याचे सांगत आहेत.

हे देखील वाचा:

मोदींवर विश्वास ठेवून यापुढे कोणतीही गोष्ट करू नका- राज ठाकरे UNCUT

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; राज्यात 1 फेब्रुवारीपासून सवर्णांना 10 टक्के आरक्षण

First published: February 4, 2019, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading