लोकसभा 2019: राज्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा धडाका, घेणार 98 सभा!

लोकसभा 2019: राज्यात मुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा धडाका, घेणार 98 सभा!

राज्यातील 48 मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा धडाका सुरु झाला आहे. लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी देखील 8 सभा घेणार आहेत. अर्थात यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील जोरदार प्रचार करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 48 मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा मुख्यमंत्री फडणवीस घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रचाराची मुख्य जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच असणार आहे. म्हणून निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन सभा म्हणजेच येत्या महिन्याभरात मुख्यमंत्री साधारणत: 98 सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी काही सभा एकत्र घेतल्या होत्या. पण यापुढे दोन्ही नेते स्वतंत्र सभा घेणार आहेत.

मोदी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींच्या शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित व्यासपीठावर दिसणार आहेत. तर संयुक्त मेळावे आणि सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रित सभा न घेता वेगवेगळा प्रचार करणार आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी सभा घेता याव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते.

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात 8 सभा

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी PM मोदी महाराष्ट्रात येणार आहेत. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. चार टप्प्यांपैकी प्रत्येक टप्प्यात दोन अशा रितीने मोदी राज्यात एकूण 8 सभा घेणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. मोदींच्या या आठ सभेच्या दृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. मात्र या सभा कुठे घ्यायच्या आणि सभांची संख्या वाढवायची काय याबाबतचा अंतिम निर्णय PM मोदीच घेणार आहेत.

मोदींची पहिली सभा 1 एप्रिल रोजी वर्धा येथे होणार आहे. दरम्यान, त्यांची शेवटची सभा मुंबईत घेण्याच्या हलचाली पक्षाकडून सुरु आहेत. अर्थात राज्यात मोदी कधी, कुठे आणि केव्हा सभा घेणार याचे नियोजन अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

First published: March 29, 2019, 10:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading