ईशान्य मुंबईचा वाद: आम्ही देखील जशास तशी भूमिका घेऊ- भाजप कार्यकर्ते

ईशान्य मुंबईचा वाद: आम्ही देखील जशास तशी भूमिका घेऊ- भाजप कार्यकर्ते

किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असला तरी यावरुन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील खदखद सुरु आहे.

  • Share this:

मुंबई, 29 मार्च: ईशान्य मुंबईतील भाजपचा उमेदवार शिवसेनाच ठरवणार हे स्पष्ट झाले असले तरी यावरुन सुरु झाले वाद अद्याप संपलेला नाही. ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असला तरी यावरुन भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील खदखद सुरु आहे.

सोमय्या यांच्या उमेदवारीवरुन सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. ईशान्य मुंबईत जर शिवसेना सहकार्य करणार नसले तर आम्हालाही जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. अर्थात केवळ ईशान्य मुंबईच नव्हे तर कोकणातील भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर नाराज आहेत.

एकदा युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करणे आवश्यक असल्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आता या मुद्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजप आणि शिवसेना युतीतील ईशान्य मुंबईतील उमेदवारावरुन गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या चार वर्षात सोमय्या यांनी शिवसैनिकांचा छळ केल्याचे सांगत सेना कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध केला आहे. इतक नव्हे तर जर सोमय्या यांना उमेदवारी दिली तर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करु अशी धमकी वजा इशारा सेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. आता या सर्व घडामोडीनंतर सोमय्या यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. तर ईशान्यमधून कोणाला उमेदवारी द्यायची याचे पर्याय शोधले जात आहेत.

VIDEO माझं पहिलं भाषण का ट्रोल झालं? पाहा पार्थ पवार काय म्हणाले..

First published: March 29, 2019, 8:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading