लोढा ग्रुपला स्टॅम्प ड्यूटी चुकवल्याप्रकरणी 473 कोटींचा दंड

येत्या तीस दिवसात लोढा ग्रुपला ही रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2017 04:33 PM IST

लोढा ग्रुपला स्टॅम्प ड्यूटी चुकवल्याप्रकरणी 473 कोटींचा दंड

04 मे : वडाळा इथल्या 5 हजार 700 कोटी रुपयांच्याजमीनीच्या व्यवहाराची स्टॅप ड्यूटी जाणूनबुजून चुकवल्या प्रकरणी  राज्य सरकारच्या स्टॅप आणि रजिस्ट्रेशन विभागानं लोढा ग्रुपला 474 कोटींचा दंड ठोठावला. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या लोढा ग्रूपच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं निर्माण झाली आहे.

लोढा ग्रूपची मालकी आमदार मंगलप्रभात लोढा कुटुंबियांकडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा ग्रूपला स्टॅप ड्यूटी न भरल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. तसंच समुहाला 474 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, हा दंड 30 दिवसांच्या आत जमा करण्याचा आदेशही दिला आहे. या आदेशानुसार, दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, याप्रकरणी आपण दाद मागणार असल्याचं लोढाकडून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close