मुंबई, 03 जून: कोरोनाची (Maharashtra corona cases) साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवा नियमावलीमध्ये काही अटी शिथिल करण्यात आल्या आहे. पण, आता लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियम आणखी शिथिल करावी, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊन शिथिलतेबाबत आज महत्वाचे निर्णय घोषणा करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या कमी आहे तिथं जिल्हाबंदी शिथील होण्याची शक्यता आहे. रुग्ण संख्या कमी तिथे मॉल्स, सिनेमागृह, क्रीडांगण यांना ही परवानगी देण्याची शक्यता आहे.
'तब्बल 15 दिवस उपाशीपोटी राहिलो'; मिर्झापूरच्या दद्धा त्यागींचा संघर्ष
ऑक्सिजन बेड आणि रूग्ण संख्या आलेख बघून जिल्ह्यात निर्बंध ठेवायचे की नाही, याबाबत शिथिलता नियमावली करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसंच, इयत्ता दहावी आणि बारावी परिक्षा रद्द करण्याची भूमिका आधी सरकारने मांडली आहे. याबद्दल आपत्कालीन विभागाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. बारावीचा निकाल आणि गूण कसे द्याचे याबाबत शिक्षण विभाग निकष ठरवणार आहे.
अशी आहे सध्याची नियमावली?
दरम्यान, राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण, काही निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी आहे, अशा जिल्ह्यातही निर्बंध हटवले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहणार आहेत.
ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत कोरोना पॉझिटीव्हीटी (Corona positivity rate) दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशातील निर्बंधांप्रमाणे कडक निर्बंध लागू असणार आहेत.
PF खातं आपोआप होतं बंद; EPFO चा हा नियम माहितेय का? अडकू शकतात पैसे
29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल. 2011 च्या जणगणनेनुसार, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहणार आहे.
तसंच, पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक द चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News