मुंबई, 28 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थिती लॉकडाऊन लागून करण्याची मागणी होत आहे. याच परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी दीड वाजता महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दि. 28 जून 2020 रोजी दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर राज्याचा आढावा घेतला होता. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, नेते, मंत्र्यांसोबत कोरोना परिस्थितीवर चर्चा केली होती.
लहान मुलांना जपा, मुंबईत आढळली कोरोनासह नव्या आजाराची लक्षण
तर दुसरीकडे लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉक जाहीर करत अनेक अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. परंतु, अनलॉकच्या काळात देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. आता दोन दिवसांत अनलॉकची मुदत संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनलॉक2.0 चे चित्र कसेल असेल, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 59 हजार 133 वर
अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत होत असलेली वाढ अजूनही सुरूच आहे. शनिवारी तर आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5318 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 59 हजार 133वर गेला आहे. सगल दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी 167 जणांचा मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7273 वर गेला आहे.
पुण्यात अनलॉकच्या 25 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या तिपटीने वाढली
लॉकडाऊन उठताच 25 दिवसातच पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. 25 मार्चला लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत पुणे शहरात 299 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 15 एप्रिल ते 3 मे या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पुण्यात 1444 रुग्ण आढळून आले. तर 4 मे ते 17 मे या तिसऱ्या टप्प्यातही पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊन हा आकडा 1641 पर्यंत गेला.
संजय राऊत सुशांतला 'हा' रोल करणार होते ऑफर, पण...
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात (18 मे ते 31 मे) पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत या काळात 2909 रुग्ण आढळले. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच कोरोना संसर्गाने टोक गाठत शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. 1 जून ते 26 जून या अनलॉक-1 च्या काळात शहरात तब्बल 8325 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे अनलॉकची प्रक्रिया पुणे शहरासाठी कशी घातक ठरली, हे या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
कल्याण-डोंबिवलीत कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लॉकडाउन
कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रात 12 जून ते 25 जून या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3177 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये आता कडक लॉकडाउन करण्यात येणार आहे.
संपादन - सचिन साळवे